PostImage

pramod abhiman raut

Dec. 3, 2023   

PostImage

FDCM NEWS ; एफडीसीएम कर्मचाऱ्याचे सलग तिसऱ्या दिवशी अन्नत्याग सत्याग्रह …


 

चिमूर प्रतिनिधी :-

       महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरक शासन स्तरावरून मंजुरी मिळावी याकरिता 01 डिसेंबर पासून महामंडळातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी  नागपूर, चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,यवतमाळ,नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे,पालघर या जिल्ह्यात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आज सत्याग्रहाचा तिसरा दिवस आहे. सदर आंदोलनकर्ते 25 कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची प्रकृती खालावली असून त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता सूचना वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या आहेत. परंतु कर्मचारी यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दर्शवून जोपर्यंत थकबाकी मंजूरीची मागणी मंजूर होत नाही, तोपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवणार असा निर्धार कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत.
          वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविणेकरिता 4 डिसेंबर पासून पूर्णपणे काम बंद आंदोलन करून मागणी पूर्ण होईपर्यंत महामंडळ बंद ठेवणार आहेत. महामंडळचे कर्मचारी यांच्या अन्नत्याग सत्याग्रह व कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील महामंडळाचे 14 वन प्रकल्प विभाग, 03 प्रदेश कार्यालयातील कामकाज बंद होणार आहे. तसेच महामंडळाचा  बल्लारशहा, डोंगरगाव या मोठ्या डेपोसह सर्व लाकूड विक्री आगार बंद राहणार आहेत, त्यामुळे महामंडळाचे कोट्यावधीचे राजस्व व राज्यातील फर्निचर मार्ट व बांबू व्यावसायिक, छोटे-मोठे व्यावसायिक यांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचे कामबंद आंदोलनामुळे वनसंरक्षण व क्षेत्रीय कामे बंद पडणार आहेत. महामंडळाचे क्षेत्र दुर्गम व अतिदुर्गम भागात असल्याने लाखो लोकांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. 
           त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 2 हजार कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यास शासनाची व प्रशासनाची डोकेदुखी वाढवणार हे नक्की आहे. तसेच सदर आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ शासनाने महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात तात्काळ मंजुरी द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करु अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ कर्मचारी संघटनेने घेतली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील कार्याध्यक्ष बी.बी.पाटील, सरचिटणीस श्री रमेश बलैया, उपाध्यक्ष राहुल वाघ, रवी रोटे, सचिव कृष्णा सानप, अभिजीत राळे, गणेश शिंदे, सुधाकर राठोड, श्याम शिंपाळे, मनोज काळे, दिनेश आडे, प्रतीक्षा देवलकर यांनी मांडली. तसेच महामंडळातील कर्मचारी यांच्या हक्काचे लढाई करिता या सत्याग्रह आंदोलनाकरिता सर्व वनउपज वाहतूक ठेकेदार, लाकूड, फर्निचर खरेदीदार यांनी  सहकार्य करावे असे आवाहन वनविकास महामंडळा तर्फे करण्यात आले.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@

         शासनाचे व प्रशासनाने अन्न त्याग सत्याग्रह कडे दुर्लक्ष केलं आहे तीन दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रहासाठी 150 कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रात बसलेले त्यापैकी सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी 25 जणांची प्रकृती खराब झाली आहे 4 डिसेंबर पासून परत अन्नत्याग सत्याग्रहासाठी जवळपास नव्याने 500 च्या वर कर्मचारी बसणार आहेत आता लढा अधिक तीव्र करणार सातव्या वेतन आयोगाचा फरक बाबतचा लढा आमच्या हक्काचा आहे त्यामुळे शासनाने तात्काळ याच्यावर योग्य निर्णय घ्यावा व आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा 
     *रमेश बलैया, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना*